सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अपक्षांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान शरद पवार यांना मनसेच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्यात आलं असता त्यांनी टीका न करता आपल्यालाही इतक्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं असं उत्तर दिलं. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांचा एकही आला नाही आणि आमचेही फक्त 10 आले. या निवडणुकीत आम्हालाही इतक्या कमी जागा मिळतील असं त्यांनाही वाटत नव्हतं”. “आमची जी अपेक्षा होती तसा निकाल नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. त्याचा अभ्यास करणं, कारणीमांसा करणं याची गरज आहे. नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभं राहावं लागेल,” असंही शरद पवार म्हणाले आहेत.