दापोली : मंडणगड ते म्हाप्रळ दरम्याने शेनाळे घाटामध्ये चिंचाळी धरण ठिकाणी दाभोळ – मुंबई एस.टी. बस रस्ता सोडून १५ फुट खाली घसरून पलटी झाल्याने अपघात झाला. सोमवार १३ जानेवारी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी गाडीमध्ये ४१ प्रवासी प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.