
हिंदू धर्मात महाकुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. कारण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक महाकुंभ मेळा आहे. आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला सुरवात झाली आहे. तर हा महाकुंभ मेळा 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. यंदाच्या वर्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती हा तीन नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये अनेक भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी या मेळ्याला उपस्थित राहतात.
प्रयागराजमध्ये सुरु झालेल्या या महाकुंभ मेळाव्यासाठी तब्बल 45 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच या मेळाव्यासाठी साधू-संत, भाविक याशिवाय परदेशातील व्यक्ती देखील सहभागी होणार आहेत, त्यामुळे यंदाच्या वर्षी सुरक्षेसाठी 55 हून अधिक फोर्स असणार आहेत.
Maha Kumbh 2025 l महाकुंभ 2025 च्या शाही स्नानाची तिथी! :
पौष पौर्णिमा – 13 जानेवारी 2025
मकर संक्रांती – 14 जानेवारी 2025
मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025
वसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025
माघ पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025
महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025



