जानेवारी महिन्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून सोने-चांदीत दरवाढ दिसून आली. दोन्ही धातूंनी या दिवसांत मोठी आघाडी घेतली. मात्र, या आठवड्यात ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. जळगावातील सराफा बाजारात चांदीच्या भावात संक्रांतीला एक हजार 800 रुपयांची घसरण झाली. सोन्यात देखील घसरण पाहायला मिळाली.
आजचे सोने-चांदीचे रेट-
शनिवारी 91 हजार 300 रुपयांवर असलेली चांदी काल, 14 जानेवारीरोजी 1800 रुपयांची घसरण होऊन 89 हजार 500 रुपये प्रति किलोवर आली. तर, शनिवारी 78 हजार 600 रुपयांवर असलेले सोने सोमवारी 200 रुपयांनी महाग झाले. मात्र, आज 15 जानेवारीरोजी घसरणीचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.



