नवी दिल्ली: दिल्लीत काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल त्यांच्या मतदारसंघात पराभूत होत आहेत अशी भविष्यवाणी केली होती. ती आज खरी ठरली आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून कधी आघाडीवर कधी पिछाडीवर असा पाठशिवणीचा रंगलेला खेळ आता संपला आहे. अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत.
भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना 3186 मतांनी पराभूत केले आहे. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे ६०० मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. भाजपला बहुमत मिळत आहे. काँग्रेसला भोपळा मिळाला आहे.




