
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या 395 व्या जयंतीनिमित्त राज्य पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय व पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर तसेच शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी दिली.
या महोत्सवातंर्गत राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यदार्थाच्या स्टॉलचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या जिद्दीचे प्रतीक असलेली शिवनेर महोत्सव बैलगाडा शर्यत घेण्यात येणार असून भव्य कबड्डी स्पर्धाही असणार आहे.
