
पुणे: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद अर्थात सीआयएससीई बोर्डाची दहावीची परीक्षा आजपासून (दि. 18) सुरू होणार आहे. पहिला पेपर इंग्रजी भाषेचा (इंग्रजी पेपर-1) असेल.
या दहावीच्या परीक्षा 27 मार्च 2025 पर्यंत चालतील. परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने परीक्षा मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेशपत्र सोबत ठेवा
बोर्डाच्या परीक्षेला बसणार्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे; जेणेकरून त्यांची पडताळणी करता येईल. प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.
