वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. जेव्हा एका ग्रहातून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी ग्रहांची युती देखील जुळून येणार आहे. या सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो.
ज्योतिष शास्त्रात, शनी आणि राहू दोन्ही ग्रहांचं वेगळं असं महत्त्व आहे. राहू ग्रह एका राशीत जवळपास 18 महिन्यांपर्यंत स्थित असतात. तर, शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
जुळून येणार राहू-शनीची युती
राहू आणि शनीची युती मीन राशीत जुळून येणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर पाहायला मिळणार आहे. सध्या मीन राशीत राहू ग्रह स्थित आहे. तर, शनी ग्रह 29 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे राहू आणि शनीची मीन राशीत युती होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम तीन राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश तुम्हाला प्राप्त होईल. तसेच, नोकरीतून चांगला नफा तुम्हाला मिळेल. समाजात चांगला मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमचे अनेक दिवसांपासून जे पैसे थांबले आहेत ते तुम्हाला परत मिळतील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी शनी आणि राहूचा सहयोग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ मिळेल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्या धन-संपत्तीत अचानक वाढ झालेली तुम्हाला दिसेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात चांगला आनंद टिकून राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल, तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल.