संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.
मुंडेंचा राजीनामा स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशीर झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्विकारला आहे. पुढील कारवाई करता राज्यपालांकडे मी राजीनामा पाठवला आहे. त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारुन यांना मुक्त करण्यात आलं आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस माध्यामांना दिली आहे.
काल झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना ‘उद्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या’, असा आदेश दिला.



