मुंबई : १५ वी विधानसभा गठीत होऊन जवळपास चार महिने उलटल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या. महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांना प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद मिळाले. मुख्य विरोधी पक्षाकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सोपविण्याची प्रथा असली तरी शिवसेनेऐवजी (ठाकरे) काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते इच्छुक होते. विरोधी पक्षामध्ये सर्वाधिक आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे असूनही लोकलेखा समितीचे अध्यक्षपद मात्र काँग्रेसला मिळाले. या समितीमध्ये विरोधी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांना एकमेव स्थान मिळाले आहे.
● नारायण कुचे (अनुसूचित जाती कल्याण) ● मोनिका राजळे (महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण) ● किसन कथोरे (इतर मागासर्वग कल्याण) ● शिवेंद्रसिंह राजे भोसले (आमदार निवास व्यवस्था)
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (विविध चर्चा) ● राहुल कुल (सार्वजनिक उपक्रम) ● संतोष दानवे (पंचायत राज)
● नरेंद्र भोंडेकर (विशेषाधिकार) ● चंद्रदीप नरके (अशासकीय विधेयके व ठराव) ● डॉ. बालाजी किणीकर (आहार व्यवस्था)
● अॅड. आशीष जयस्वाल (धर्मादाय व खासगी रुग्णालये तपासणी)
● सुनील शेळके (रोहयो) ● दौलत दरोडा (अनुसूचित जमाती कल्याण)
● आशुतोष काळे (मराठी भाषा) ● उपमुख्यमंत्री अजित पवार (सदस्य वेतन व भत्ते) ● उपमुख्यमंत्री अजित पवार (सदस्य निवृत्तिवेतन)



