
वक्फ (सुधारणा) कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. वक्फ कायद्यात केलेल्या अनेक तरतुदींबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्रश्न विचारले. वक्फ कायद्यात सुधारणा करताना वक्फ बोर्डावर बिगरमुस्लीम सदस्यांची नेमणूक करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आता हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करणार का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायाधीश केव्ही विश्वनाश यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी सुरू आहे.




