जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ येथील सुफेन जंगल भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी चकमक कायम राहिली. गुरुवारी झालेल्या चकमकीत ३ पोलीस शहीद झाले. तर या कारवाईदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक धीरज कटोच आणि इतर दोन पोलिस तसेच १ पॅरा स्पेशल फोर्सेसचा एक लष्करी जवान जखमी झाला. या परिसराची सुरक्षा दलांनी घेराबंदी केली असून, अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहे.
कठुआ येथे सुरू असलेल्या दहशतवादविरोधी ऑपरेशनदरम्यान ‘सफियान’ गावाजवळ जम्मू आणि काश्मीर दलातील काही पोलिस शहीद झाल्याची पुष्टी भारतीय लष्कराच्या ‘रायझिंग स्टार कॉर्प्स’ने ‘एक्स’ वरील पोस्टमधून केली आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यानंतर जगातील अनेक बड्या नेत्यांकडून भारताला पाठिंबा मिळत आहे. त्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधत व्यक्त केला. याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही या हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. तर काही माजी खेळाडूंनी भारताने पाकिस्तानबरोबरचे क्रिकेटमधील सर्व संबंध तोडावे अशी मागणी केली आहे.



