श्रीनगर : काश्मीरमधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामच्या बैसरण व्हॅलीत मंगळवारी (दि.२४) पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी घडवलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी बैसरणची निवड का केली, याचं उत्तर त्या परिसराच्या भूगोलात दडलं आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात येथील नकाशे आणि प्रत्यक्ष चित्रफितीद्वारे याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
बैसरणला कोणतेही वाहन पोहचू शकत नाही
असा करावा लागतोय बैसरणपर्यंतचा जीवघेणा प्रवास
बैसरणला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात तरीही….
स्थानिक व्यापारी काही सुरुवातीचा टप्पा दुचाकीवर पार करतात, पण तो मार्गही पक्का नाही. इतक्या अवघड भूभागामुळे, कोणतीही आपत्कालीन सेवा किंवा सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचायला किमान ३०-४० मिनिटं लागतात. दररोज शेकडो पर्यटक बैसरणला भेट देतात, तरीही या मार्गावर कोणतीही पोलीस तुकडी तैनात नव्हती, हे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तांकामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे.

हल्ला करण्यापूर्वीच दहशतवादी होते तयारीत