दिल्ली : पहलगामच्या बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी भारतीयांवर जीवघेणा, अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये २७ जण मारले गेले. यानंतर भारताने कठोर पावले उचलत गुरुवारी (दि.२४) पाकिस्तानशी असलेले राजनैतिक संबंध कमी केले. यानंतर काही तासांतच भारताने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील पाकिस्तान सरकारच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर (X) बंदी घातली.
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. दिल्लीत पोहचल्यानंतर मोदींनी विमानतळावरच तातडीची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी हल्ल्याची माहिती घेतली. हल्ल्यानंतर मोदी थेट ॲक्शनमध्ये दिसले. यानंतर त्यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीचीदेखील तातडीने बैठक बोलावली आणि पाकिस्तान विरोधात रणनिती आखली.

पाकिस्तान विरोधात भारताने उचलली ‘ही’ कठोर पावले पावले
- सिंधू जल वाटप करार स्थगित
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२३) कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) बैठक झाली. या बैठकीत सिंधू जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पाकिस्तानातील ८० टक्के लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
- पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द
पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासात भारत सोडण्याचे आदेश
- वाघा-अटारी बॉर्डर राहणार बंद
- पाकीस्तान हाय कमिशनच्या ५ अधिकाऱ्यांना हटवले. त्यांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- पाकिस्तानचे अधिकृत ‘X’ अकाऊंट केले ब्लॉक