
भारत पाकिस्तान देशात तणावाचे वातावरण असताना पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशत वाद्यांकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच या परिसरात जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचीही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रालच्या नादिर गावात सुरक्ष दल आणि दहशतवाद्यांमध्ये अंधाधुंद गोळीबार झाला. पुलवामामध्ये गेल्या 48 तासांत दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर पोस्ट करत चकमकीची माहिती दिली आहे.
त्रास भागातील नादिरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतावद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेझा घातला आहे. त्यामुळे पोलिसांकडून शोस मोहिम सुरु आहे. असे काश्मीर झोन पोलीसांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.