पुण्यातील व्यापाऱ्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले आहेत. तुर्की सफरचंद बॉयकॉट केल्याने व्यापाऱ्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले आहेत. तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यानं इतर व्यापारांनाही धमकी आल्याचं कळतंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असतानाच तुर्कस्तानने पाकिस्तानला चिथावणी मिळेल अशी कृती केली होती. भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना तुर्की सैन्याच्या काही हालचालींनी भारताचं लक्ष वेधून घेतलं होतं. तुर्कस्तानी लष्कराची ‘सी-130 ई’ ही लष्करी मालवाहू विमानं कराची विमानतळावर उतरल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर देशभरातून ‘बॉयकॉट तुर्की’चा सूर उमटला. अनेकजण तुर्कीचे वस्तू बॉयकॉट करत असून सर्वांत आधी पुण्यातील व्यापाऱ्यांनी तिथले सफरचंद विकण्यावर बहिष्कार टाकला. यानंतरच त्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्याचं कळतंय.
पाकिस्तानमधून धमकी आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे का, असा प्रश्न विचारला असता झेंडे पुढे म्हणाले, “अजिबात नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे मावळे आहोत. आम्हाला कसली भीती नाही. शिवाय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अजित डोवाल हे सर्वजण आहेतच. पुण्यातील पोलीसही आमच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत.” एकीकडे तुर्कीतील फळं, वस्तूंवर बहिष्कार टाकला जात असताना आता दुसरीकडे तुर्कीच्या टूरिझमलाही बॉयकॉट करण्याची मागणी सेलिब्रिटी करत आहेत.