इराण आणि इस्त्रायलमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरात हवाई हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नाही तर इस्रायलने इराणवर हवाई हल्ले करताना इराणमधील तेल डेपो, गॅस रिफायनरी प्रकल्प देखील लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. असं असातानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलने गाझा मदत केंद्रावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल ३८ पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भातील माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली असून त्यांनी म्हटलं की, “गाझाच्या दक्षिण भागात अन्न वितरण केंद्रांभोवती सोमवारी झालेल्या गोळीबारात ३८ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मदत केंद्रांभोवती दररोज होणाऱ्या गोळीबाराच्या घटनेतील ही सर्वात मोठी आणि प्राणघातक घटना होती”, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.