
फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांच्या याद राखा, या इशाऱ्यावर शरद पवारांनी आता आमच कसं व्हायचं? असा खोचक प्रश्नही उपस्थित केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्ग वाद सुरु झाला आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार ठाम असून शेतकऱ्यांसह अनेक विरोधक नेत्यांनी मार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी (दि. 24 जून) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या दृष्टीने 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आता यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शक्तीपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. देवेंद्र फडणवीसच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. फडणवीसांच्या याद राखा, या इशाऱ्यावर शरद पवारांनी आता आमच कसं व्हायचं? असा खोचक टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. त्या भागातला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलतायेत त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.



