बुलढाणा : मुंबई भोंगामुक्त झाल्यानंतर गुरुवारपासून बुलढाण्यातून भोंगामुक्त महाराष्ट्र अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी प्रार्थना स्थळावरचे भोंगे उतरवले. त्याच पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील भोंगे उतरवण्याची मोहीम करावी या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडं मागणी केली आहे अशी माहिती, भाजपा नेते किरीट सोमैया यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पोलीस अधीक्षकांसोबत सुमारे अर्धा तास चर्चा : भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या गुरूवारी बुलढाणा दौऱ्यावर होते. दुपारच्या सुमारास ते शहरात आले. किरीट सोमय्या शहरात आल्याची माहिती समजताच प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना बुलढाण चिखली राज्य मार्गावरीव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गाळले. बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याशी अर्धा तास चर्चा केल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पोलीस अधीक्षकांना केली विनंती : “संध्याकाळी अकोला इथं भेट देऊन अन्य विषयावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या समवेत चर्चा करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या यासंदर्भातील आदेशाचा सरकार आणि आम्ही सन्मान करतो. त्यानुसारच भोंगे काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आपण बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन त्यांनाही मुंबईप्रमाणं भोंगे काढण्याची कारवाई करावी, अशी विनंती केली आहे, अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमैया यांनी दिली.


