मुळशी तालुक्यातील भुकूम ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील वाढते नागरिकीकरण त्यानुसार वाढत जाणारी पाण्याची मागणी विचारात घेऊन मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येईल, असं स्पष्ट केलं. ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. त्यामार्फत स्थानिक नेतृत्वाचा विकास होतो. स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत छोटी असली तरी त्यांची क्षमता मोठी आहे.
स्थानिक पातळीवर विविध विकासकामं करून स्थानिकांच्या समस्येचं निराकरण करत त्यांस न्याय देण्याचं काम करता येतं. गावातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहिले पाहिजे, त्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. विकासकामं करताना दूरदृष्टी ठेवली पाहिजे. नागरिकांचे प्रश्न स्वार्थ बाजूला ठेवून वेळेत मार्गी लावली पाहिजेत. गावाची हद्दवाढ होताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे.