नवी दिल्ली : देशात चौथी लाट येणार कि काय अशा चर्चाना उधाण येत आहे. त्यातच आता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे.
या अगोदर पॅनेलने डिसेंबर २०२१ मध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता दिली होती. ६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण करताना, कंपनीला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी आणि त्यानंतर पाच महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला योग्य विश्लेषणासह डेटा सबमिट करण्यास सांगितले आहे. करोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु आता लहान मुले देखील कोरोनाचा नवीन प्रकार XE च्या कचाट्यात सापडत आहेत.



