नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला संपूर्ण देशात युवकांमध्ये तीव्र विरोध होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशभरात युवकांनी रस्त्यावर उतरत आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील या योजनेला विरोध दर्शवला आहे. सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही, तसेच केवळ २१ व्या वर्षी आपण या तरुणांना माजी सैनिक कसे करू शकतो? असा थेट सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.
We can't keep soldiers on rent. How can we make them ex-soldiers merely at age of 21? They protect country in harsh conditions.Politicians never retire it's only soldiers,public who retire…We don't need military on rent.Agnipath scheme must be taken back:Punjab CM Bhagwant Mann pic.twitter.com/Gqn0lpyMtg
— ANI (@ANI) June 17, 2022
भारत मातेची सेवा व रक्षण करण्याचे काम सैनिक कठीण परिस्थितीही करतात. राजकारणी कधीही निवृत्त होत नाहीत, केवळ सैनिक निवृत्त होत आहेत. जनतेलाच सेवेतून निवृत्त केलं जात आहे. आपल्याला भाड्याने सैनिक ठेवण्याची गरज नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने बेरोजगार युवकांच्या माथी मारलेली अग्निपथ योजना मागे घेतली पाहिजे आम्ही या योजनेचा विरोध करतो. आम्हाला सैन्य भाड्याने नको आहे. आमचे तरुण सैन्यात जाऊ इच्छित आहे, त्यांच्या देशभक्तीचा सन्मान करा. जोपर्यंत ते सक्षम आहेत तोपर्यंत त्यांना देशाची सेवा करू द्या असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे.