अजमेर, 18 जून : भारतात घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं कायद्याने गुन्हा आहे. पहिली पत्नी असताना पतीला दुसरं लग्न करण्याची हिंदू धर्मात परवानगी नाही. शिवाय कोणतीच महिला आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला मान्यता देणार नाही. असं असताना भारतात असं एक गाव आहे, जिथं खुद्द बायकोच हसत हसत आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देते, तेसुद्धा ती प्रेग्नंट झाल्यावर.
आपण प्रेग्नंट होताच बायको आपल्या दुसऱ्या नवऱ्याचं लग्न लावून देते. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, यावर विश्वास बसणार नाही पण असं करण्यामागे एक खास कारण आहे.
पहिली पत्नी प्रेग्नंट असताना नवऱ्याने दुसरं लग्न करण्याची ही अजब प्रथा आहे ती राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील देरासर गावातील. कित्येक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. बायको प्रेग्नंट असताना नवरा दुसरं लग्न करतो आणि त्याची बायको, समाज कुणीच त्याला काही बोलत नाही.