गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील प्रचारसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा खरपूस समाचार घेत म्हटले आहे की जे खूप पूर्वीच सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत ते पुन्हा सत्तेत येण्यासाठी यात्रा काढत आहेत. सुरेंद्रनगर शहरातील एका सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, अनेक जण गुजरातचे मीठ खाऊनही गुजरातला दूषणे देत आहेत. देशातील एकूण मिठाच्या उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन गुजरातमध्ये होते.
मेधा पाटकर यांच्या अनुषंगाने यात्रेवर टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी ४० वर्षे नर्मदा धरण प्रकल्प रखडवला त्यांच्यासोबत ते चालत आहेत. नर्मदा धरण प्रकल्प रखडवणाऱ्यांना शिक्षा देण्याचा निर्णय गुजरातच्या जनतेने घेतला आहे. निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी काँग्रेसचे लोक मला औकात दाखवू, असे शब्दप्रयोग करीत आहेत. असे मोदी म्हणाले आहे.



