वहागाव (ता. कराड) येथील जि.प. केंद्र शाळेस सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शाळा व्यवस्थापन समितीचा पुरस्कार खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जि. प. शाळेचे मुख्याध्यापिका अंजली कुंभार, शिक्षिका सुवर्णा पाटील, सरपंच संग्राम पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिणी नलवडे, संभाजी पारवे, आनंदी पवार, समीना मुल्ला, संजय पवार, हरिदास पवार, सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाचे संस्थापक प्रवीण लादे, उदय भंडारे, अध्यक्ष महेश लोखंडे, सचिव संगीता वाघमारे, मधुकर भंडारे, शारदा लोकरे, रूपाली काटे उपस्थित होते. वहागाव केंद्र शाळेने गेल्या एक वर्षापासून आपली शाळा आपला अभिमान लोकचळवळ सुरू केली आहे. या लोकचळवळीमुळे ग्रामस्थ स्वतःहून जि. प. शाळेस आर्थिक व सर्व प्रकारची मदत करत आहेत. या मदतीमुळे शाळेचे संपूर्ण रुपडेच पालटले आहे.




