पुणे : पुण्यातील पाणीकपातीवर आज कालवा समितीची महत्वाची बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. या बैठकीला अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, अजित पवारांनी या बैठकीला उपस्थित राहणे टाळलं आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील देखील नियोजित वेळेपेक्षा उशिरा आले. मात्र गाडीतून उतरताच चंद्रकांत पाटलांनी आधी अजित पवारांची आठवण काढत चिमटा काढला आहे.
चंद्रकांत पाटलांनी मी अजितदादांसाठी धावत पळत आलोय ते कुठे गायब झाले?, असे म्हणत अजित पवारांना चिमटा काढलाय. ते पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे कालवा बैठकीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आज (२६ एप्रिल) पुण्यातील शासकीय विश्रामगृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाटील हे या बैठकीला आले. मात्र, गाडीतून उतरताच त्यांनी तेथील उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले “अजितदादा आलेत का? दादांसाठी मी धावत पळत आलो आहे, आज ते कुठे गायब झाले..?” , चंद्रकांत पाटील गमतीने जरी म्हटले असले तरी त्याची राजकीय अर्थ काढले जात आहेत.




