पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीत विजय मिळवून दाखवत मी रवींद्र धंगेकर असं प्रत्युत्तर दिलं होतं.
आता रवींद्र धंगेकरांनी पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांतदादा मुळचे पुणेकर नाहीत. ते पाहुणे म्हणून आले आहेत, आणि विधासाभ निवडणुकीच्या लाटेतले ते आमदार आहेत. चंद्रकांत पाटलांनी कुठे ही बोट ठेवावं, महाराष्ट्रात कुठेही त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे, असं ओपन चॅलेंजच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले आहे.
वेताळ टेकडीच्या विकास संदर्भात चंद्रकांत पाटील आग्रही आहेत. मात्र, वेताळ टेकडीचा विकास करून ती तोडू नये असा स्थानिकांची आणि स्वतः भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची मागणी आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी वेताळ टेकडीचा विकास रेटून धरला आहे. या प्रश्नाकडे लक्ष करत रवींद्र धंगेकर यांनी पाटलांना धारेवर धरलं आहे.




