
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन सुरू आहे. अशातच लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी आधी १०० महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आणि आता १,००० कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत असल्याचा आरोप ब्रिजभूषण यांनी केला. तसेच “मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?” असा सवाल केला. ते एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत लालकृष्ण अडवाणींचा रथ चालवला होता याचा संदर्भ देत मुलाखतकाराने अडवाणींवर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा देताना काय भूमिका घेतली हे सांगितलं. त्यानुसार अडवाणी म्हणाले होते, “राजकीय विश्वासार्हता खूप मुलभूत गोष्ट आहे. लोक आम्हाला मतं देतात. आम्हाला त्यांचा विश्वास कायम ठेवायचा आहे. मला माहिती आहे की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे मला कशाचीही भीती नाही. मी राजीनामा देतो.” तसेच तुम्ही अडवाणींचा रथ चालवला, मग तुमच्यात राजीनामा देण्याची हिंमत का येत नाही? असा सवाल के




