पाटण : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पाटण मतदारसंघातील गुढे (तळमावले) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी विधानपरिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
या मेळाव्याला खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्य. सह. बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, आ. दिपक चव्हाण, दिपक पवार, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, राजेश पाटील आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्यात थेट फाईट पाहायला मिळते. आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच २ नेत्यांमध्ये लढत पाहायला मिळू शकते.




