पुणे – नैराश्य, भावनिक तणाव आणि एकटेपणाने ग्रासलेल्यांना आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या “साथी हाथ बढाना’ या संस्थेतर्फे “लिसनिंग पोस्ट’ उपक्रमाची हेल्पलाइन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा विनामूल्य हेल्पलाइन असून, मोबाइलवर किंवा प्रत्यक्षात संस्थेच्या कार्यालयात संवाद साधता येणार आहे. “साथी हाथ बढाना’ ही स्वयंसेवकांनी एकत्रित येऊन सुरू केलेली संस्था असून, मानसिक व भावनिक तणावात असलेल्यांसाठी काम करते.
येथे होणारी संभाषणे गोपनीय आणि विशेषत: मानसिक आघातातून जात असलेल्यांसाठी खुप मदत करणारे आहेत. लिसनिंग पोस्ट ही सेवा पूर्णतः मोफत असून, मानसिक आरोग्याभोवती लागलेला कलंक पुसून काढणे आणि लोकांना गरज पडेल तेव्हा त्यांना मदत घेण्यास प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे. नागरिक 9373-39-162 या हेल्पलाइन क्रमांक संपर्क साधू शकतात.




