
नवी दिल्ली – बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांची पुढील नीती निश्चित झाली. या बैठकीला २६ राजकीय पक्ष उपस्थित होते. याच बैठकीत काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. काँग्रेसने माघार घेताच तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी राय म्हणाल्या की, जर काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असेल तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील.
पत्रकारांशी बोलताना शताब्दी म्हणाल्या, ‘आमच्या नेत्या ममता यांनी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमची पुढची योजना काहीशी वेगळी असू शकते. पण स्वप्न पाहण्यात किंवा इच्छा असण्यात काहीच गैर नाही.




