
देशविरोधी कृत्याच्या (Pune ATS News) संशयावरून पुण्यातून कोथरूड परिसरातून एटीएसने काल दिनांक 18 जुलै रोजी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या ताब्यात घेतलेल्या दोन संशयीत दहशतवाद्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना 25 जुलै पर्यंतची कोठडी सुनावली आहे.
काल पुणे पोलीस आणि ATS ने संयुक्त कारवाई करत दोघांना कोथरुड येथून अटक केली होती. आज या दोन्ही आरोपींना पोलीसांनी कोर्टात हजर केले होते. मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
या दोन्ही आरोपींकडे अनेक संशयास्पद (Pune ATS News) वस्तू आढळल्या आहेत. दोघांनी देशविरोधी कारवाई केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या सगळ्यांचा तपास करण्यासाठी पोलीसांकडून आरोपींची कस्टडी मागण्यात आली. ती मान्य करत आरोपीना 6 दिवसाची कोठडी सूनवाण्यात आली.




