बंगळुरू : एखाद्या – राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे सध्याचे जे निकष आहेत ते बदलण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारला केली आहे. दुष्काळाच्या स्थितीबाबत प्रत्येक राज्याची वास्तविकता मान्य करणारी आणि वेळेवर मदत देणारी अधिक प्रतिसादात्मक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
कर्नाटकात झालेल्या अपुऱ्या नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दुष्काळ व्यवस्थापनासाठी २०१६मध्ये निश्चीत करण्यात आलेल्या ‘कठोर’ मापदंडांत बदल करून २०२०मध्ये ते अद्ययावत करण्यात आले आहेत. त्यानुसार निकष निश्चीत केले जावेत, असे म्हटले आहे.




