बारामती प्रमाणेच मी पिंपरी चिंचवड शहरावर प्रेम करतो. कारण “इथली माती आणि इथली माणसं” माझीच….
पिंपरी : राज्याच्या राजकारणात पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले अजित पवार यांचे आज शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रामकृष्ण मोरे सभागृहात संपन्न झाला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो. या शहराने मला अनेक जीवाभावाची माणसे दिली आहेत. मी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतो त्या बारामती प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरावरतीही प्रेम करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडकरांची मने जिंकली.
यावेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेेरे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, नगरसेवक पंकज भालेकर, श्याम लांडे, संजय वाबळे, अतुल शितोळे, तानाजी खाडे, शमीम पठाण, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र जगताप, प्रवीण भालेकर, सतीश दरेकर, विनोद नढे, समीर मासुळकर, विक्रांत लांडे, राहुल भोसले, वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, विनया तापकीर, पौर्णिमा सोनावणे, मोहम्मद पानसरे, निहाल पानसरे, श्रीधर वाल्लेकर आदी आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, कामगार नगरीमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक आलेले आहेत. त्यांना या शहरात रोजगार, जीवनावश्यक वस्तू, दळणवळण, नागरी सुविधा आणि महत्त्वाचे सुरक्षित वाटले पाहिजे. शरद गाड्या जाळल्या जातात, महिलांची छेडछाड केली जाते हातात कोयते घेऊन दहशत पसरली जाते अशा सर्व गुन्हेगारांचा मुस्क्यावरून त्यांच्यावर मोका लावून शहरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. या शहराने मला अनेक जीवाभावाची माणसं दिली आहेत. आपल्या प्रेमाने व आशीर्वादामुळे शहराचा विकास करताना मला खूप समाधान मिळते. अगदी माझ्या बारामती प्रमाणेच मी पिंपरी चिंचवड शहरावर प्रेम करतो. कारण “इथली माती आणि इथली माणसं” मला माझीच आहेत असे वाटतात असे म्हटले आहे.




