भोपाळ : माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार जयवर्धन सिंह यांचे एक विधान समोर आले आहे. भाजपचे अनेक नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपचे बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात आल्याच्या त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील बदरवासमध्ये रोड शो केल्यानंतर जयवर्धन सिंह बोलत होते. शिवपुरी जिल्ह्यातील अनेक असंतुष्ट भाजप नेते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. आगामी काळात भाजपचे अनेक असंतुष्ट नेते मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये दाखल होतील. असंतुष्ट भाजप नेत्यांना अशा पक्षात सामील व्हायचे आहे जिथे काम निष्पक्षपणे केले जाते आणि कार्यकर्त्यांचे ऐकले जाते.
यावेळी जयवर्धन सिंह यांनी दावा केला की, या वर्षीच्या अखेरीस होत असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसला १७० पेक्षा जास्त जागा मिळतील. १५ महिन्यांच्या कमलनाथ सरकारच्या काळात चांगली कामे झाल्याचे सर्वसामान्यांना कळले आहे.
जयवर्धन सिंह म्हणाले की, या १५ महिन्यांत केलेले चांगले काम पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत जनता कमलनाथजींना पूर्ण ५ वर्षांची संधी देईल, असा विश्वास वाटतो.




