नवी दिल्ली, ता. ५ : महागाई दर चार टक्क्यांपर्यंत कमी करण्यावर भारतीय रिझव्हं बँकते लक्ष केंद्रित केले असून, पुरवठा साखळीतील अडथळे कमी करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न करण्यास बँक तयार आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज येथे केले.
दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘आर्ट ऑफ मनिटरी पॉलिसी मेकिंग: द इंडियन कॉन्टेक्स्ट’ या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान झाले. “जागतिक चलनवाढ, कोरोना साथीचा परिणाम आणि रशिया युक्रेन युद्धामुळे चलनविषयक धोरण आखणे आव्हानात्मक झाले आहे,” असे दास यांनी यावेळी सांगितले.
भारतातील चलनविषयक घोरणाची चौकट सिद्धांत आणि देशाच्या पद्धती, अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप आणि वित्तीय बाजारातील घडामोडीच्या अनुषंगाने विकसित झाली आहे. आताच्या काळातील व्यापक उद्दिष्टांमध्ये, महागाई नियंत्रण, वाढ आणि आर्थिक स्थैयांवरील सापेक्ष भर यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक धोरणांमध्ये काळानुरूप बदल झाला आहे,” असेही दास म्हणाले.
कोविड महासाथ आणि रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी रिझव्हं बँकेने केलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. “कमी व स्थिर चलनवाढ दीर्घकालीन बचत व गुंतवणुकीचे नियोजन करण्यात मदत करते. ज्यामुळे नवकल्पना उत्पादकतेसह शास्वत वाढ होते याउलट, उच्च व अस्थिर चलनवा उत्पादकता आणि दीर्घकालीन वाढीन क्षमता कमी करून अर्थव्यवस्थेला श्री करते,” असेही ते म्हणाले.




