रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. या जोडीने आज आणखी एक विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी करत पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या जोडीने आतापर्यंत 86 डावात 62.47 च्या सरासरीने 5000 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी झाल्या आहेत.
मंगळवारी आशिया चषकात भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत. या दोन्ही खेळाडूंनी वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत सर्वोउत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहित आणि विराटची जोडी पाच हजार धावांची भागिदारी पूर्ण केली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याआधी वनडे फॉरमॅटमध्येटीम इंडियासाठी आतापर्यंत केवळ 2 जोड्यांनी 5000 धावांचा टप्पा पार पार केला आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने याआधी पाच हजार धावांची भागिदारी केली. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी वनडेमध्ये 8227 धावांची भागिदारी केली आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 5193 धावांची भागिदारी केली आहे. या विक्रमाला रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने विक्रम केला आहे.




