नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी विचारात घेतलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन करण्यासाठी काही तथ्यात्मक डेटा नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. आमच्याकडे निकाल आणि निकालांच्या गुणवत्तेचा डेटा असून सर्वोच्च न्यायालयातील नियुक्ती अधिक पारदर्शक आहे, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायाधीशांच्या निवडीसाठी वस्तुनिष्ठ मापदंड मांडणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
कॉलेजियमबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या शंकांबाबत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी वस्तुनिष्ठ मापदंड निश्चित केले जातील, असे विधान त्यांनी केले.
सरन्यायाधीश म्हणाले, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी पात्र असलेल्या न्यायाधीशांचे मूल्यांकन करण्यासाठी नियोजन आणि संशोधन केंद्राने मोठ्या स्तरावर काम सुरू केले आहे. या समितीने दिलेला तपशील आणि संबंधित न्यायाधीशांनी सांगितले.




