मुंबई – भारत आपल्या शेतकऱ्यांच्या कायम ऋणात आहे, अशी भावना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली. किसान ऋण पोर्टल, घर-घर किसान क्रेडिट कार्ड आणि हवामान माहिती नेटवर्क डेटा यंत्रणा यांचा प्रारंभ नवी दिल्लीत झाला.
या प्रसंगी सीतारामन बोलत होत्या. करोना साथीच्या काळात टाळेबंदी लागू असताना ग्रामीण भारत, शेतकरी समुदाय आणि कृषी क्षेत्रानं भारताची गती कायम ठेवण्याची काळजी घेतली, असे त्यांनी सांगितले. शेतकरी समुदायाने देशात अन्नसुरक्षा राहण्यासाठी प्रयत्न केले, तर ग्रामीण भारताने अर्थव्यवस्थेला बळ दिलं, असे त्या म्हणाल्या. किसान ऋण पोर्टलमुळे किती जणांना सेवांचा लाभ मिळाला, याची त्या त्या वेळी प्रत्यक्ष माहिती त्या पोर्टलवर उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली आणि या उपक्रमाला यश मिळण्यासाठी बँकांकडून पाठबळ मिळण्याचीही ग्वाही दिली.




