हैदराबाद : फायबर – नेटच्या घोटाळ्यात राज्याचे ११४ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना ताब्यात घेण्यासाठी संक्रमण कोठडी मिळावी असा अर्ज आंध्र प्रदेश पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे. मंगळवारी रात्री विजयवाडा येथील भ्रष्टाचार विरोधी न्यायालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
३३० कोटी रुपयांच्या या एपी फायबरनेट घोटाळ्यात आपल्या पसंतीच्या कंपनीच्या लाभासाठी टेंडर प्रक्रिया घोटाळा केला गेला असा आरोप सीआयडीने नायडू यांच्यावर केला आहे. टेंडरची प्रक्रिया सुरू झाल्यापासून संबंधित योजना पूर्ण होईपर्यंत अनेक गोष्टींत अनियमितता झाली असल्याचे आढळून आले आहे.




