नवी दिल्ली – कॅनडामध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीय समुदायाला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज सावधगिरीचा इशारा दिला आहे. स्थानिक भारतीयांनी कॅनडाच्या काही भागात सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांपासून सावध राहावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
स्थानिक रहिवाशांबरोबर जे लोक कॅनडामध्ये प्रवास करणार आहेत, त्यांनीही अशा भारतविरोधी कारवायांपासून सावध राहावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी संसदेत केलेल्या निवेदनानंतर भारत आणि कॅनडा दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय संबंध बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर हा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. कॅनडात वास्तव्याला असलेला खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता.



