नवी दिल्ली :- गेल्या सात वर्षांच्या काळात ५ ते १२ वर्षांच्या वयोगटातील बालकांना रेल्वेने फूल तिकीट लागू केल्याने त्यातून रेल्वेला २८०० कोटी रुपयांचा जादाचा महसूल मिळाला असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे.
२१ एप्रिल २०१६ पासून हा नवीन निर्णय रेल्वेने लागू केला आहे. त्यानुसार ५ ते १२ वयोगटातील बालकांनी स्वतंत्र सीट किंवा बर्थ वापरली तर त्यांना पूर्ण तिकीट दर लागू करण्यात आला. या आधी या बालकांना स्वतंत्र सीट किंवा बर्थ वापरली तरी केवळ निम्मे भाडे आकारले जात होते; परंतु आता पूर्ण भाडे द्यावे लागत आहे.
त्याद्वारे रेल्वेने बाल प्रवास भाडे नियमांमध्ये सुधारणा करून गेल्या सात वर्षांत बाल प्रवाशांकडून २,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त महसूल मिळवला आहे, असे आरटीआयच्या उत्तरात आढळून आले आहे. सन २०२२-२३ या एका वर्षातच रेल्वेला त्यातून ५६० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसुल मिळाला आहे.




