इम्फाळ : मणिपूरच्या रोशिबिना देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशुमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. गेले चार महिने रोशिबिनासाठी एका कडव्या परीक्षेपेक्षा कमी नव्हते. एकीकडे मणिपूर हिमाचारात जळत होते, जिथे तिचे आई-वडील आणि भावंडे अडकली होती, तर दुसरीकडे ती श्रीनगरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करत होती.
श्रीनगरमधून रोशिबिना रोज तिच्या आई – वडिलांशी रोज बोलायची ती तयारीत व्यस्त असायची, पण तिचं मन मणिपूरमध्येच असायचं. रोशिविनाचे कुटुंब मणिपूरमधील सर्वाधिक हिंसाचारग्रस्त भाग असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहते. जेव्हा ती तिच्या वडिलांशी हांगझोऊमध्ये बोलली तेव्हा त्यांनी रोशिविनाला तिची चिंता बाजूला ठेवत देशासाठी पदक जिंकण्यास सांगितले.
शीविनाचा सराव आणि आहारासाठी तिच्या वडिलांनी आपली जमीनही विकला. याच रोशिविनाने गुरुवारी बुशच्या ६० वजनी गटात रौप्यपदक पटकावले. तिला अंतिम फेरीत चीनच्या जिओ बेईकडून ०-२ ने पराभव पत्करावा लागला. रोशिविनाने जकार्ता एशियाडमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
रोशिविना सांगते की ती मैतेई समाजातून येते. गावाच्या रक्षणासाठी तिचे आई-वडील नाईट गार्ड म्हणून काम करत, दररोज गस्त घालत आहेत. जूनमध्ये ती तिच्या वडिलांना शेवटची भेटली होती, पण ती अजूनही गावी जाऊ शकत नाही. पदक जिंकल्यानंतर रोशिविनाने कुकी आणि मैतेई समुदायांमधील हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले. आपले हे पदक शांतताप्रिय देशबांधवांना समर्पित असल्याचे रोशिविनाने सांगितले, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
मे महिन्याच्या तीन तारखेपासून आरक्षणाच्या प्रश्नावरून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याने हिंसाचार सुरू झाला. यामध्ये आजवर १८० हून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत.




