नवी दिल्ली :- भारतविरोधात चीन आपल्या आक्रमक – कारवाया सोडत नाही, असे दिसून येत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतरही प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात आहे. भारताशी सुरू असलेल्या सीमेवरील तणावादरम्यान, ड्रॅगनने २०२२ पासून एलएसीवरील आपली लष्करी उपस्थिती आणि पायाभूत सुविधांचे बांधकाम वाढवले असल्याचा दावा अमेरिकेच्या पेंटागॉनच्या एका अहवालात करण्यात आला आहे.
वर्ष २०२३च्या “मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ अहवालानुसार, बीजिंगच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी एलएसीवर भूमिगत स्टोरेज सुविधा, नवीन रस्ते, दुहेरी उद्देशीय विमानतळ आणि अनेक हेलिपॅड बांधले जात आहेत.
या अहवालात म्हटले आहे की भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबा रेषावर २०२३ सालापासून सुरू असलेल्या तणावादरम्यान सीमा सीमांकनाबाबत भिन्न धारणा आहेत. दोन्ही बाजूंनी अलीकडील पायाभूत सुविधांच्या बांधकामामुळे दोघांमध्ये अनेक संघर्ष झाले आहेत. त्याचबरोबर एलएसीवर सैनिकांची जमाजमव हे देखील दोघांमधील संघर्षाचे प्रमुख कारण मानले जात आहे.
एलएसीवर चीन काय करत आहे ?
■ लष्करी पायाभूत सुविधा
■ डोकलामजवळ भूमिगत साठवण सुविधा
■ एलएसीच्या तीनही सेक्टरमध्ये नवीन रस्ते
■ वादग्रस्त भागात, भूतानमध्ये गावांची निर्मिती
■ दुहेरी-उद्देशीय हवाई तळ
■ पँगॉन्ग सरोवरावर नवीन पूल




