नोएडा (पीटीआय). सापाच्या विषाची तस्करी केल्याप्रकरणी यूट्यूबर आणि बिग बॉस सिझन २ चा विजेता एल्विश यादव याच्यासह सहा जणांविरुद्ध नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. गुन्हा दाखल होताच एल्विश यादव फरार झाला आहे. नोएडामध्ये बेकायदा रेव्ह पार्टीचे आयोजन करणारा एल्विश यादव हा परदेशातील मुलींना धुंदी आणण्यासाठी सापाच्या विषाचा वापर करायचा. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाच जणांकडून नऊ विषारी साप जप्त केले आहेत.
नोएडाच्या सेक्टर 95 च्या पोलीस ठाण्यात प्राण्यांचे हक्कासाठी लढणाऱ्या पीपल्सवर एनिमल्स संघटनेने दिलेले तक्रार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एल्विशने आरोप फेटाळले
बिग बॉस ओटीटी सिझन २ चा विजेता झाल्यानंतर चर्चेत आलेला एल्विश यादव याने आरोप फेटाळले आहेत. इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले, “ आज सकाळी झोपेतून जागा झालो असता माझ्याविरुद्ध कशा रीतीने बातम्या पसरविल्या जात होत्या, ते पाहिले. एल्विश यादव अमली पदार्थासह पकडला गेला. त्याला अटक झाली, अशा प्रकारचे वृत्त आपण पाहिले. या सर्व गोष्टी माझ्याविरुद्ध पसरविल्या जात आहेत, माझ्याविरुद्ध आरोप केले जात आहे, ते बिनबुडाचे आहेत. सर्व खोटे आहे. यात एक टक्के देखील सत्यता नाही. आपण उत्तर प्रदेश पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहोत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करू इच्छित आहे की, या प्रकरणात माझा ०.१ टक्के जरी सहभाग असेल तर सर्व जबाबदारी घेण्यास आपण तयार आहोत.




