पुणे, ता. ३ : स्वातंत्र्यपूर्व काळात ‘ईस्ट वेस्ट’, या नावाने ‘तो’ ओळखला जायचा. त्या काळातही त्याचा रुबाब काही कमी नव्हता. पण ‘ईस्ट वेस्ट’ काही मराठी संस्कृतीच्या पचनी पडणार नाव नव्हतं. अखेर १९२१-२२ हे उजाडलं आणि ‘त्याला’ नाव मिळालं, लक्ष्मी रस्ता. या रस्त्याने यंदा १०१ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने व्यवसायाला भरभराटी देणाऱ्या लक्ष्मी रस्त्याबद्दल ‘प्रकाशमय’ कृतज्ञता व्यक्त केली ती पुणे स्थानिक व्यापाऱ्यांनी…..
पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन (युआरटीजीए) व पुणे सराफ असोसिएशन यांच्यातर्फे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता व बाजीराव रस्त्यावर हे विद्युत रोषणाई करण्यात आली पडणार त्याचे उद्घाटन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया ‘यूआरटीजीए’चे अध्यक्ष राजेश शेवानी असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र अष्टेकर, महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल उपस्थित होते.




