मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत ‘मामा’ नावाने प्रसिद्ध असलेले राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच नेतृत्व जनतेने पुन्हा एकदा मान्य केल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवराज सिंह चौहान हे पुन्हा एकदा मध्यप्रदेशात बहुमत मिळवताना दिसत आहेत. त्यांचं पॉलिटीकल करिअर धोक्यात आहे म्हणणाऱ्यांना चौहान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
विधानसभा निवडणूक २०२३ ही भाजपसोबतच सध्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी देखील कठीण परीक्षा असल्याचे बोलले जात होते. चौहान हे तब्बल २० वर्षांपासून मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. २० वर्षात त्यांनी राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याचा परिणाम म्हणून जनतेने पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांना संधी दिली आहे.
मध्यप्रदेश एकूण संख्या ; २३०
भाजप : १६१
काँग्रेस : ६६
इतर : ०३
शिवराज सिंह चौहान यांचा जन्म ५ मार्च १९५९ च्या सीहोर जिल्ह्यातील जैत या गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव प्रेम सिंह चौहान आणि आईचं नाव सुंदरबाई चौहान आहे. शिवराज सिंह चौहान कीर समाजाशी निगडीत आहेत जे शेती करतात. शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास शिवराज सिंह चौहान यांनी बरकतउल्ला यूनिव्हर्सिटीमधून एमचे शिक्षण घेतलं आहे. त्यांनी तत्वज्ञान विषयातून एमएमध्ये गोल्ड मेडल देखील जिंकलं होतं, मात्र त्यांनी अॅग्रीकल्चरीस्ट हाच पेशा म्हणून निवडला.
शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशात सर्वाधिक काळासाठी मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. याखेरीज मध्ये प्रदेशात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनल्याचं रेकॉर्ड देखील त्यांच्याच नावावर आहे.
२४ मार्च २०२० रोजी शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली होती. शिवराज सिंह चौहन १९७२ मध्ये जेव्हा ते १३ वर्षांचे होते तेव्हापासून आरएसएसमध्ये सामील झाले होते.
दरम्यान मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३ च्या निकालानंतर आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विक्रमी पाचव्यांदा शिवराज सिंह बसणार की दुसऱ्या कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




