हैदराबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे मंत्र्यांच्या ताफ्याने सहाय्यक पोलिस अधीक्षक (एएसपी) आयपीएस परितोष पंकज यांना चिरडल्याने या घटनेत ते जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस अधीक्षक (एएसपी) बंदोबस्तावर असताना मंत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, आयपीएस परितोष पंकज, जे भद्राचलमचे एएसपी आहेत, सोमवारी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शहर दौऱ्यादरम्यान बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ही घटना घडली.




