पुणे: पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची बदली झाली. त्यानंतर खेमनार यांची बदली होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच खेमनार हे स्वतः हूनच बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. अशी चर्चा रंगली होती.




