पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या झालेल्या अचानक बदलीचा जोरदार शहरात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्यांचा पुणे महानगरपालिकेतील किमान कालावधी पूर्ण झालेला नाही. तसेच त्यांच्या बदलीने महापालिकेच्या कामावर परिणाम होईल. त्यामुळे त्यांची बदली करू नये. अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनांत मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेच्या आणि मार्गदर्शक तत्त्वाच्या आधाराने काही बदल्या करणे प्राप्त होते. त्याप्रमाणे त्या झाल्या असतील. परंतु ढाकणे हे त्या बदलीच्या निकषात बसतच नाहीत असे आम्हाला वाटत नाही. पुण्यामध्ये केवळ २० महिने कार्यरत असताना थोड्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगलं कम करताना शहराच्या विकासात भर टाकली. त्याच्या प्रशासनातील कसब पणाला लावणार श्री. विकास ढाकणे यांनी लोकांच्या मनात घर केलं आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त नवीन, एक अतिरिक्त आयुक्त नवीन आणि फक्त एकच जुने अतिरिक्त आयुक्त बिनवडे कार्यरत आहे. तसेच महापालिकेतील चार उपायुक्तांच्या देखील बदल्या झालेल्या आहेत. या सगळ्या घडामोडीचा शहराच्या विकास कामांवर परिणाम होऊ शकतो. आमची मागणी आहे की श्री विकास ढाकणे यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये ठेवावे. त्यांची बदली रद्द करणे करणे हा सरकारचा अधिकार आहे हे आम्हाला मान्य आहे. तरीदेखील आमची आपणास विनंती आहे की पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी श्री विकास ढाकणे यांना कार्यरत ठेवावे. असे निवेदनात म्हटले आहे.
भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील अधिकारी विकास ढाकणे यांची १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पहिली राज्यात पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर राज्यात राजकीय सत्ताबदल झाले आणि त्याची केवळ १७ महिन्यात १३ सप्टेंबर २०२२ मध्ये बदली करण्यात झाली. त्यानंतर ३ डिसेंबर २०२२ मध्ये त्याची पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. ढाकणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. कोरोनाच्या काळात त्यांनी तेथे आरोग्य सेवा देण्यासाठी विशेष काम केले. त्यांच्या कारकिर्दीत स्वच्छता, प्रशासकीय काम यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.




